सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच असून, 23 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) 2 लाख रुपये प्रति किलोच्या खाली आला. चांदीचा हा जवळपास 11 महिन्यांतील नीचांकी स्तर असल्याचा दावा बाजारातील तज्ज्ञांनी केला आहे. दुसरीकडे सोन्याचा भावही घसरून 1.42 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, महागाईची चिंता आणि अमेरिकेतील व्याजदर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे.
शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात MCX वर 4 डिसेंबर 2026 रोजी मुदत संपणारे चांदीचे फ्युचर्स 1.74 टक्क्यांनी घसरून 1,96,122 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होते. त्याच मुदतीचे सोन्याचे फ्युचर्स 1,42,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होते. त्यामुळे सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही बाजारातील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.


