Wednesday, 28 October 2026

Header advertisement
● Breaking News
सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ   •   ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा ब्लॅक डे, टेम्बा बऊमाने असा काटा काढला, कांगारूंना तोंड दाखवायला जागा नाही!   •   गर्दीचा ताण कमी होणार, कसारा मार्गावर 15 डब्यांची लोकल धावणार, पण कधी?   •   बदलापूरच्या सुपुत्राचा लंडनमध्ये डंका! मिळाला वन्यजीव छायाचित्रणाचा ‘ऑस्कर’, डोळे दीपवणारा फोटो एकदा बघाच   •   सोन्या-चांदीचे भाव का कोसळत आहेत, अमेरिकेशी काय कनेक्शन, खरेदी करावं की थांबावं?   •   किसने ली 260 जानें, एक साल बाद कहां पहुंचे हम, अब किस बड़े एक्‍शन की है तैयारी?   •   सोलर पैनल लगवाना है, सब्सिडी कितनी मिलती है? प्रोसेस क्या है? PM सूर्य घर योजना भी बताएं   •   बैंक का लॉकर भी सुरक्षित नहीं? फर्रुखाबाद SBI से 1 करोड़ के पुश्तैनी जेवरात गायब!   •  
October 23, 2026 • जग

सोन्याची चैन दिली, मग गाडी मागितली, 5 लाखांसाठी विवाहितेसोबत नको ते केलं, छ. संभाजीनगरात खळबळ

लग्नाला अवघे काही महिने झाले असताना चारचाकी खरेदीसाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याचा तगादा, सोन्याच्या चैनवरून टोमणे आणि मारहाण… अशा छळाला सामोरे जावे लागल्याचा आरोप एका 25 वर्षीय विवाहितेने केला आहे. गर्भवती असताना उपचारांसाठीही सहकार्य केले नसल्याचा आरोप असून, तिचा गर्भपात झाला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि अन्य दोन नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‎या प्रकरणात पती सुमित अशोक मगरे (वय 32, व्यवसाय शिक्षक, शिक्षण एमएससी, बी.एड.), सासू विजया अशोक मगरे, सासरे अशोक मगरे, नणंद अश्विनी अजय बनसोडे आणि मोठा दीर प्रशांत मगरे (सर्व रा. प्लॉट क्रमांक 9, चांदमारी रिक्षा स्टँडजवळ, न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळ नगर, छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 25 वर्षीय पीडितेचा सुमित मगरे याच्याशी 5 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरजवळील सावंगी येथील एका लॉनमध्ये दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह झाला. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार ते पाच दिवसांतच सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यास सुरुवात झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे.